भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी प्रशालेतील मुलींनी व मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर भाषणांमधून व गाण्यांमधून प्रकाश टाकला .शाळेतील ज्येष्ठ शिक्षक उत्तरेश्वर पायघन आपल्या मनोगतात म्हणाले की , “ डॉक्टर बाबासाहेब यांनी 18 - 18 तास अभ्यास केला होता . प्रतिकूल परिस्थिती असतानाही समाजाच्या मुक्तीसाठी अभ्यासाच्या माध्यमातून रक्ताचा एक थेंबही न सांडू न देता सामाजिक क्रांती घडवून आणली होती . त्यामुळे आपण अभ्यास करून आपला व समाजाचा आर्थिक विकास करू शकतो . “  तसेच अध्यक्ष तात्या कांबळे म्हणाले की , “ बाबासाहेब म्हणजे जीवन जगण्याचा  दिशादर्शक नकाशा आहे . त्यांनी अनेक संकटावर मात करून आपल्या समाजाच्या विकासासाठी सामाजिक क्रांती घडवून आणली होती . यासाठी त्यांनी मूकनायक ,बहिष्कृत भारत ,समता ,जनता या वर्तमानपत्रातून आपले विचार समाजापर्यंत पोहोचवले होते व समाजात वैचारिक प्रबोधन घडवून आणले होते . “ यावेळी काकासाहेब पवार यांनी सर्व मुलांना खाऊ वाटप केला.

कार्यक्रमाला हायस्कूलमधील ज्येष्ठ शिक्षक काकासाहेब पवार , उत्तरेश्वर पायघन  ,दयानंद पाटील, अविनाश जोशी, राजेंद्र गाडे ,श्रीमती प्रतिभा मुकटे ,नितीन पवार ,कैलास शिंदे ,हरीश साठे आनंता  झरकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले .यावेळी विद्यार्थ्यांचे वाचन  या उपक्रमांतर्गत आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर  हा जिल्हा परिषद धाराशिव यांनी  प्रसिद्ध केलेला लेख दत्तात्रय गुंजाळ यांनी वाचून दाखवा व सर्वांनी तो एकाग्रतेने ऐकला . आणि सर्व विद्यार्थ्यांना वाचण्यास दिला.

 
Top