धाराशिव (प्रतिनिधी)-  समता नगर येथील जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी उमाकांत सांभराव नायगांवकर यांचे 25 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. ते 96 वर्षाचे होते.

त्यांच्या पाठीमागे दोन मुले, एक मुलगी ,सुना, नात जावाई,नातू ,पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर धाराशिव येथील कपिलधार स्मशानभूमीत दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगांवकर यांचे ते लहान बंधू होत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद नायगावकर व से.नि. अभियांत्रिकी अधिक्षक विनोद नायगावकर यांचे ते वडील होत.


 
Top