मुरुम (प्रतिनिधी)-   उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नी व अवघ्या 8 वर्षांच्या मुलीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली  असून आरोपी स्वतःहून मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुरूम पोलिसात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे  

मिळालेल्या माहितीनुसार, अजित अणप्पा वासुदेव हा मंगळवारी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास मुरूम पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार यांच्यासह मुरूम पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप दहिफळे व पोलिस कर्मचारी दाखल  झाले व घटनास्थळी  पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत मुरूम येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणातील मयत लिंबाबाई अजित वासुदेव तसेच 8 वर्षीय चिमुकली मानसी असे मयतांचे नावे आहेत. दरम्यान दुपारी पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी मुरूम पोलिसात दाखल झाल्या आहेत.

 
Top