तुळजापूर (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील गणेश नगर, सोरपटवाडी येथील मनिषा अंकुश धामे यांनी आज श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी 51.840 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र अर्पण केले.
मनिषा धामे या सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवींला मंगळसूत्र अर्पण केले. यावेळी धार्मिक विभागाचे विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
