धाराशिव (प्रतिनिधी)-  एखादा योद्धा कसाही करुन पराभूत होत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांची प्रतिमेबाबत लोकामध्ये सभ्रम तयार केला जातो असाच काहीसा प्रकार सद्या खासदार ओमराजे निंबाळकर दादा यांच्या बाबतीत अगदी नियोजनबद्ध केला जात आहे. पक्ष बदलाची चर्चा म्हणजे निव्वळ राजकीय षडयंत्र असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी जाधवर म्हणाले की, ओमराजे राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जनतेचा विश्वास हीच त्यांची शिदोरी असुन त्याच बळावर ते आतापर्यंत राजकारण करत आहेत. त्यांना पक्ष बदलण्याची आवश्यकता का असेल? स्वार्थ साधण्यासाठी अनेक जण पक्ष बदल केला पण एकनिष्ठ राहिले म्हणूनच जनतेनी त्यांना भरभरून मतरूपी आर्शिवाद मिळाला आहे. आता ही चर्चा घडवून विरोधी गटाला काय अपेक्षीत आहे याचा अंदाज सहज येऊ शकतो. 24 तारखेला पक्ष व चिन्ह याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अशी अफवा पसरवून लोकांच्या मनात एकप्रकारे संभ्रम निर्माण करायचा आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने ओमराजे निंबाळकर यांच्या पक्ष बदलाची चर्चा घडवून आणली जाते. पुढे आपोआप त्या बंद होतात.  खासदार म्हणून ते आजही सक्षमपणे काम करत आहेतच पण त्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात तीन आमदार निवडून आले आहेत असे तानाजी जाधवर यांनी सांगितले.


 
Top