परंडा (प्रतिनिधी)-  छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला. बुधवार दि.1 एप्रिल 2026 पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास येथील कोर्टासमोर अश्वारूढ पुतळा शिवरायांच्या मावळ्यांनी उभारण्यात आला. नंतर त्याच दिवशी सर्वपक्षीय नेत्याने पुतळा बसवणाऱ्या शिव प्रेमीवरती गुन्हे दाखल करू नये, असे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांनी काही नियम अटी घालून प्रतिसाद दिला. शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याने सकाळी शिवरायांवर पुष्प उधळून फटाके फोडून अतिषबाजी करून उत्साह साजरा केला.

यावेळी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, उबाठाचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य भाऊसाहेब खरसडे, माजी सभापती मेघराज पाटील, रिपाईचे प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, देवानंद टकले, उद्योजक रामभाऊ पवार.पैलवान नवनाथ जगताप, माऊली गोडगे,आदिसह शिवप्रेमी मोठ्या संख्येन उपास्थित होते. विनापरवाना शिवरायांचा विना परवाना पुतळा बसवल्या मुळे परवानगी मिळवण्या बाबत काल बुधवार दि.1 एप्रिल रोजी दिवसभर शिवप्रेमींच्या हालचाली सुरू होत्या. तसेच नगरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकऱ्यांना परवाना मिळवण्यासाठी तात्काळ नगर परिषदची बैठक बोलवावी असे निवदेन दिले. निवेदन देताच नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आमच्या जाहीरनाम्यात प्रत्येक वार्डात शाहू, फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे अनेक महामानवांचे पुतळे उभे करणार असून, आश्वसनाची पुर्तता करण्यात येईल. असे नगराध्यक्षांनी कर्त्यांना आश्वासन दिले.

 
Top