तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील सुरतगाव येथे दि. 22 एप्रिल पासून भव्य ग्रामीण क्रिकेटचा थरार रंगणार असुन, यामध्ये विजेत्या उपविजेत्या संघासह इतरही संघावर बक्षीसांचा वर्षाव होणार आहे. यामुळे सुरतगाव येथे होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धांसाठी जास्तीत जास्त क्रिकेट संघानी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक तथा युवा नेते दादासाहेब घोडके यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरतगाव येथे दि. 22 एप्रिल पासून भव्य अशा ग्रामीण फुल पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक शरण बसवराज पाटील (शरणभैय्या युथ फाऊंडेशन धाराशिव) यांच्या तर्फे 55,555, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अँड. अरविंद अप्पाराव बेडगे (सभापती नळदुर्ग) यांच्या तर्फे 33,333, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक राजभाई शहाजी सुरते (ग्रा.प सदस्य, सुरतगाव) 15,555 तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक श्रीकांत देवकर (यश कंट्रक्शन) यांच्या तर्फे 7,777 अशा भव्य बक्षीसांचा वर्षाव होणार आहे. याच बरोबर इतरही बक्षीसांचा वर्षाव क्रिकेट संघावर होणार आहे.
युवा पीढींचे सशक्तीकरण करावे व युवा पिढींनी मैदानी खेळांचे महत्त्व अंगीकृत करुण तंदुरुस्त जीवन जगावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेत जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदवावा,असे आवाहन घोडके यांनी केले आहे.