धाराशिव (प्रतिनिधी)-  व्ही पी एज्युकेशनल कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील कृषि महाविद्यालयात दिनांक 17 एप्रिल रोजी आयडियल ऍग्री सर्च प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यू कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या निवड प्रक्रियेत अंतिम सत्रातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी 13 विद्यार्थ्यांची अंतिम निवड कंपनीच्या निवड समितीने केली.

आयडियल ऍग्री सर्च प्रा. लि. ही कंपनी पिकांच्या आरोग्य व उत्पादनवाढीसाठी जैविक खते, सूक्ष्मअन्नद्रव्ये, वनस्पती वाढ नियंत्रक तसेच पाण्यात विद्रव्य खते यांसारख्या विविध कृषी निविष्ठा उपलब्ध करून देणारी अग्रगण्य कंपनी आहे. खत निर्मिती क्षेत्रातही कंपनीने मोलाची कामगिरी बजावली आहे.

सदर कॅम्पस मुलाखती कंपनीचे डेव्हलपमेंट हेड वैभवकुमार एस. जाधव व रिजनल हेड  प्रवीण महिंद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. निवड प्रक्रियेत सांगुळे संकेत, माळी ज्ञानेश्वर, मदने सौरभ, अनुभूले अभिषेक, घेवारे अजय, घुगे अभिजित, शेंडगे अनिकेत, साखरे प्रतिक्षा, जाधव दिप्ती, पाठक राजश्री, गंजे सरिता, मस्के प्रतीक्षा आणि भक्ती चौधरी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कंपनीच्या कार्यक्षेत्रात कृषी संलग्न काम करण्याची संधी मिळणार आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेला हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरला आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यात अधिकाधिक कृषी औद्योगिक कंपन्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी आमंत्रित करून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या कॅम्पस प्लेसमेंटच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शेख मोहसीन, डॉ. गांधले अमित, डॉ. इंगळे रोहित, डॉ. खोसे प्रताप, प्रा. सुमिथा पाटील, प्रा. दळवे सतेश, प्रा. डोके आकाश, प्रा. माळी प्रवीण, प्रा. शेटे देवानंद, प्रा. भालेकर सुनील,  प्रा. शिंदे अक्षय, प्रा. मुंडे नवनाथ, प्रा. गोटे प्रिया, प्रा. मगर प्रगती, प्रा. नागरगोजे विजय, प्रा.सुतार रामचंद्र, मुजावर गुलाब, .गिरी ओंकार यांनी मोलाची  भूमिका बजावली.

 
Top