धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील नामांकित आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या  फ्लाइंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलने आपल्या यशाची परंपरा याही वर्षी कायम राखत इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 100 टक्के निकालाची दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शाळेच्या या  यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांनी यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंदाकडून कौतुक करण्यात आले . तर या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य चंद्रमणी चतुर्वेदी आणि उपप्राचार्या जेकब मॅम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कष्टाला शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमा पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य पाटील प्रशासकीय अधिकारी सौ.मंजुळा पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

 
Top