धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, थोर स्वातंत्र्यसेनानी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. 

सदर प्रसंगी प्राचार्य डॉ देशमुख यांनी यशवंतराव यांच्या जीवनचरित्रातील महत्वाच्या कारकीर्दवर प्रकाश टाकला. तर डॉ बालाजी गुंड यांनी यशवंतराव चव्हाण आणि पुरोगामी महाराष्ट्र या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात देखील माजी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. डॉ जयसिंगराव देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या शैक्षणिक जीवनावर प्रकाश टाकला.  सदर प्रसंगी प्रा माधव उगिले, डॉ स्वाती जाधव, प्रा विवेकानंद चव्हाण, डॉ बालाजी नगरे, डॉ मारुती लोंढे,डॉ नवले, ज्ञानेश्वर बारवकर यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजशास्त्र विभागाच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा या शिर्षकावर गुलमोहर भित्तीपत्रकेचे प्रकाशन प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

 
Top