धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील महिलांनी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम होऊन समाजाच्या सर्व क्षेत्रांत पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,धाराशिव, महिला व बाल विकास विभाग जि.प.धाराशिव आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा नियोजन समिती सभागृह,धाराशिव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार होत्या.प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव डॉ.मैनाक घोष,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नीलेश काळे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) जि.प.धाराशिव श्री.देवदत्त गिरी, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,बाल विकास प्रकल्प अधिकारी परंडा गणेश कुकडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी धाराशिव श्रीमती रेश्मा पठाण व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.गणेश कुकडे यांनी केले.सूत्रसंचालन वैशाली आव्हाड, शहर अभियान व्यवस्थापक,नगर परिषद धाराशिव यांनी केले. तर आभार प्रदर्शन सखी वन स्टॉप सेंटर धाराशिवच्या केंद्र प्रशासक प्रियंका जाधव यांनी केले.
