परंडा (प्रतिनिधी)- माजी पालकमंत्री व शिंदे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर तसेच पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली जयदेव गोफणे, महादेव वळेकर, योगेश राऊत, नानासाहेब कातुरे, अशोक राऊत, बंडु अप्पा बानगुडे, बालाजी जगताप,महेश अंधारे, सुधीर रोडगे, सुधीर लटके, विष्णू पवार, राजेंद्र कुदळे, ज्ञानेश्वर अंधारे, अभिजीत गवारे, पै.राहुल वाघमारे, भारत बानगुडे, दिनेश पाटील, कुमार गटकुळ, विशाल शिंगटे, प्रशांत खरसडे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला.यावेळी धनंजय सावंत यांचा ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, परंडा न.प. उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, विकास कुलकर्णी, ॲड. जहीर चौधरी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, तालुका सरचिटणीस धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, दिव्यांग आघाडी संयोजक तानाजी घोडके, सोशल मीडिया संयोजक तुषार नेटके, उद्योजक आघाडी संयोजक नागेश गर्जे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, गायत्री तिवारी, शुभदा शेलार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

