धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा धाराशिवच्यावतीने राज्यस्तरीय गंगाधर करंडक एकांकिका स्पर्धा 27, 28, 29 मार्च या तीन दिवशी होणार असून, प्रथम पारितोषिक 51 हजार 990 ठेवण्यात आले आहे. अशी माहिती विशाल शिंगाडे व धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. 

गुरूवार दि. 19 मार्च रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना कुलकर्णी यांनी हे स्पर्धेचे 7 वे वर्ष असून, पुणे, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातून नाट्य संघ या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. नाट्य संघाची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 51 हजार 990, द्वितीय पारितोषिक 31 हजार, तृतीय 21 हजार रूपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय उत्कृष्ट पार्श्वसंगीत, उत्कृष्ट नेपथ, उत्कृष्ट अभिनय पुरूष, उत्कृष्ट अभिनय स्त्री, उत्कृष्ट प्रकाश योजना, उत्कृष्ट संहिता लेखन, उत्कृष्ट दिग्दर्शन आदीसाठी वैयक्तिक पारितोषिक ठेवण्यात आले आहेत.  यावेळी सुगत सोनवणे, आलम बेग, यशवंत शिंगाडे, शेषनाथ वाघ आदी उपस्थित होते. 


दोन दिवस नृत्य स्पर्धा

नाट्य परिषद धाराशिव शाखेच्यावतीने 30 व 31 मार्च रोजी नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये समुह नृत्य, वैयक्तिक नृत्य, लावणी नृत्य यामध्ये स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. प्रथम पारितोषिक समुह नृत्यासाठी 21 हजार रूपये आहे. या स्पर्धेचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे शुभम खोत व सुरेश देवकुळे यांनी सांगितले. तसेच शेवटच्या कलावंतांचा मेळावा ही घेण्यात येणार आहे. 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top