धाराशिव (प्रतिनिधी)-  देवगिरी प्रांत द्वारा धाराशिव जिल्हा संस्कार भारती समितीच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर संभाजीनगर व श्री राम मंदिर समर्थ नगर येथे समितीच्या कला साधकांनी सुबक रांगोळी रेखाटून दीपोत्सव साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी देवगिरी प्रांत सह महामंत्री डॉ. सतिश महामुनी, प्रांत दृष्य कला संयोजक शेषनाथ वाघ, प्रांत छायाचित्र संयोजक पद्माकर मोकाशे, श्री स्वामी समर्थ मंदिर विश्वस्त अमर पाटील, राहुल पताले, दयानंद काकडे, श्रीराम मंदिर विश्वस्त रघुराज कुलकर्णी , श्रीपाद देशपांडे , जिल्हा संरक्षक अनिल ढगे, प्रभाकर चोराखळीकर, जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, जिल्हाउपाध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे, जिल्हासचिव प्रविण गोरे, जिल्हा कोष प्रमुख अरविंद पाटील, जिल्हा संगीत संयोजक सुरेश वाघमारे, जिल्हा दृष्य कला संयोजक लक्ष्मीकांत सुलाखे ,शहराध्यक्ष शरद वडगाकर शहरसचिव गणेश कसपटे आदि कला साधक उपस्थित होते. श्रीराम मंदिरात संस्कार भारतीच्या ध्येय गीत म्हणून पुढील वर्षाच्या नियोजनाची छोट्या खानी बैठकीत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सह या कार्यक्रमाची प्रसायदानाने सांगता झाली.


 
Top