वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाशी येथील दोन विद्यार्थी सैनिक स्कूल परीक्षेत पात्र ठरले आहेत.
कुमार सत्यजित सुधीर उंदरे 232 गुण व कुमारी समाधान गवारे 227 गुण घेऊन दोन्ही विद्यार्थी पात्र ठरले आहेत. दोन्ही विद्यार्थ्यांचे रजिस्टर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सविता भारत मोळवणे व सुनिता रमेश वाकडे,सविता श्रीधर महामुनी,ज्ञानेश्वर नारायण जानगेवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सत्कार ही केला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हंसराज कवडे व उपाध्यक्ष विकास क्षीरसागर यांनीही दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
