धाराशिव (प्रतिनिधी)-   मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे वेळीच महत्त्व ओळखून मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेऊन पदवी मिळविली, त्याचा  आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयाने दिलेल्या सॉलिडवर्क्स, कॅटिया, सीरिओ यांसारख्या सॉफ्टवेअरच्या मूलभूत प्रशिक्षणामुळे कंपनीत माझी त्वरित निवड झाली आणि आज मी 23 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळवत आहे. याबद्दल महाविद्यालयाचा मी ऋणी आहे. असे गौरवोद्गार ढोणे यांनी काढले.

पुढे बोलताना ढोणे म्हणाले की, सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्लास्टिक मोल्डिंगसारख्या क्षेत्रात डिझाईन सॉफ्टवेअरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी पदवीबरोबरच कौशल्यावर आधारित सहा ते नऊ महिन्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार महाविद्यालयात इनपुट कोर्सेस व मोफत प्लेसमेंट प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजसह देश-विदेशात संधी उपलब्ध होत आहेत. मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. डी. डी. दाते यांचेही मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ह्या उज्ज्वल यशाबद्दल  तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे  अध्यक्ष तथा माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, मित्राचे उपाध्यक्ष संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, कार्यकारी विश्वस्त मल्हार पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व्यवस्थापकीय समन्वयक गणेश भातलवंडे, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, उद्योजक, कर्मचारी व आजी माझी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

 
Top