धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशनचा कारभार सध्या पूर्णपणे ढासळल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हागणदारी मुक्त गाव योजनेअंतर्गत खेडोपाड्यांमध्ये कोणतेही ठोस काम किंवा योजना राबविल्या जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असताना, संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचे जनजागृती कार्यक्रम किंवा स्वच्छता अभियान राबवले गेलेले नाही. प्रत्यक्षात काम न करता फक्त कागदोपत्री योजना दाखवून प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही होत आहे.