धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकर व राज्य सरकार मान्यताप्राप्त शेतीमाल हरभरा हमीभाव खरेदीकेंद्र मौजे पळसप येथे कुलस्वामिनी कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्था लि. पळसप या संस्थेस मान्यता देण्यात आली आहे.
संस्थेचे चेअरमन लक्ष्मण सरडे यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी हरभरा हमीभावाने विक्री करण्यासाठी खरेदी केंद्र पळसप येथे आपापली शेतकरी नोंदणी करून घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. शासन हमीभाव 5875 रूपये प्रति क्विंटल एवढा आहे. सध्या मार्केट मध्ये हरभऱ्याचे भाव कमी असल्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी 25 मार्च 2026 पूर्वीच नोंदणी करावी. नोंदणीसाठी 7/12 उतारा हरभरा पिकपेरा नोंद असलेला, 8 अ, आधारकार्ड, बँकपासबुक, व स्वतः हजर राहून नोंदणी करावी असे जाहीर आवाहन केले आहे.