धाराशिव (प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र ज्ञान मंडळ गेल्या 25 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र ज्ञान मंडळाद्वारे इ. 5 वी ते 9 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी 01 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत एमकेसीएल ऑलिम्पियाड मूव्हमेंट 2025 स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धा परीक्षेमध्ये श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील महाराष्ट्र ज्ञान मंडळ मान्यता प्राप्त अण्णा इन्फोटेक या अधिकृत प्रशिक्षण केंद्रातून इयत्ता 5 वी ते 9 वी मधून एकूण 866 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रशालेतील विद्यार्थी विहान विश्वास शेवाळे, सृष्टी बाळकृष्ण उंबरे, सिद्धी महेश सावंत, सिद्धांत नरसिंग माने, इशा विश्वनाथ शामराज यांनी यश मिळविले.
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम तसेच पर्यवेक्षक इंगळे वाय.के., गुंड बी.बी., सुनील कोरडे, राजेंद्र जाधव, गोरे बी.एम. व प्रा. विनोद आंबेवाडीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ तसेच सायन्स रोबोटिक कीट देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अण्णा इन्फोटेकचे चेअरमन आदित्य पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. सदर परीक्षा घेण्याचे कार्य अण्णा इन्फोटेकचे वैजनाथ स्वामी, आदित्य पाठक व अथर्व पाठक यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. व्ही. शेंडगे यांनी केले.
