तुळजापूर (प्रतिनिधी)- खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन पदी महाविकास आघाडीच्या अनिता श्रीकांत वाघे यांची निवड तुळजापूर तालुक्यातील सर्व क्षेत्रावर भाजपचा झेंडा असताना खरेदी-विक्री संघावर मात्र महाविकास आघाडीने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.
तुळजापूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री.संघ मर्यादित तुळजापुरच्या चेअरमनपदी महाविकास आघाडीच्या अनिता श्रीकांत वाघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेचे सुनील जाधव यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या या रिक्त पदावर ही निवड करण्यात आली असे अध्यासी अधिकारी ए.व्ही.जाधव सहायक निबंधक कार्यालय तुळजापुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत अनिता श्रीकांत वाघे यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित संचालक शिवाजी बोधले, सुहास साळुंके, व्हा.चेअरमन अनिल शिंदे, सुधीर कदम, सुनिल जाधव, श्रीकांत वाघे, खंडाप्पा पावले, माणिक तोडकरी, भैरू जाधव, संजय धुरगुडे, संघाचे लिपिक दयानंद क्षीरसागर उपस्थित होते.
