मुरुम (प्रतिनिधी)- आदरणीय रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांच्या उमरगा विधानसभा धाराशिव लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या निमित्ताने मी खंबीरपणे त्यांच्या सोबत होते. जनतेत सहभागी होत होते जनतेच्या प्रेमामुळेच माझ्या स्वप्नात नसतानाही मला धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होता आले. प्राध्यापक रवी सरांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली मी जिल्हा परिषदेमध्ये काम करताना शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवेन असे आश्वासन चंद्रकांत गणपतराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात सन्माननीय उषाताई रवींद्र गायकवाड उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण आणि आरोग्य जिल्हा परिषद, धाराशिव यांनी उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच माझ्यासहित अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. उमरगा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी माननीय राजपूत साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक गणपतराव पाटील होते.
चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काक्रंबा वाडी तुळजापूर इथून आपल्या सेवेचा प्रारंभ केला तर नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलदेव निंबाळा पदवीधर पदोन्नती नंतर सुपतगाव, समुद्राळ येथे कार्य केले. विषय तज्ञ समावेशित शिक्षण अपंग विभाग यात दोन वर्षे सेवा केली. लमाण तांडा डाळिंब सहशिक्षक, निलेगाव तालुका तुळजापूर तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणेगुर येथे पाच वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावतानाच सेवानिवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात विस्तार अधिकारी डाळिंब बीट म्हणूनही त्यांनी कार्य केले. धाराशिव जिल्ह्यामध्ये शिक्षक समितीची स्थापना करत धाराशिव जिल्हा शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
शिक्षक आणि विद्यार्थी प्रिय विविध विषयांवरचा अभ्यास असलेले मनमिळावू ,सहनशील, उपक्रमशील शिक्षक चंद्रकांत पाटलांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांनी सत्कार केला. विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर धाराशिव जिल्हा परिषदेच्या नूतन उपाध्यक्ष सन्माननीय उषाताई रविंद्र गायकवाड यांचा सत्कार पाटील कुटुंबीयांच्या वतीने मुख्याध्यापिका रसिका पाटील मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलदेव निंबाळा यांनी केला. गटशिक्षणाधिकारी माननीय अमोल राजपूत साहेब यांचा सत्कार रमेश पाटील सहाय्यक कृषी अधिकारी उमरगा यांनी केला. पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब स्वामी यांचा सत्कार बालाजी बिराजदार जिल्हा उद्योग अधिकारी कोल्हापूर यांनी केला.
सेवा निवृत्तीनिमित्त सन्माननीय उषाताई गायकवाड यांनी विस्तार अधिकारी तथा मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील आणि मुख्याध्यापिका रसिका पाटील यांचा सपत्नीक शाल फेटा आणि हार देऊन सत्कार केला. नुकतीच कलदेव निंबाळा ग्रामपंचायत उपसरपंचपदी मीरा पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मीरा पाटील आणि सहाय्यक कृषी अधिकारी रमेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सन्माननीय उषाताई गायकवाड यांनी करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. माननीय कोकळगावे सर केंद्रप्रमुख, क्षीरसागर सर यांनी केंद्रीय प्राथमिक शाळा डाळिंब केंद्राच्या वतीने चंद्रकांत पाटील आणि रसिका पाटील यांचा सत्कार केला.
बलसुर केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख माननीय गोपी पवार भुसार सर यांनी शाल फेटा आणि विठ्ठल मूर्ती देऊन सन्मान केला. माननीय तावशीकर मुख्याध्यापक शहीद भगतसिंग हायस्कूल यांच्या वतीने चंद्रकांत पाटलांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक शाळा येणेगुरच्या सर्व सहकाऱ्यांकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार करण्यात आला. श्रीधर डोंगरे, सरोजा डोंगरे, निवृत्त मुख्याध्यापक गोविंदराव डोणगावे ,कल्लेश्वर गायकवाड ,सुबोध फुलारी, सोलापूर, जि. प. प्रा. शा. महालिंगरायवाडीचे सर्व स्टाफ, जाधव सर भालेराव सर, मुल्ला सर ,यादव मॅडम, भोसले मॅडम, ज्ञान प्रसारक विद्यालय, सुंदरवाडी यांच्यावतीने माननीय अभिमन्यू गायकवाड ,धुळे सर, यांनी सत्कार केला. संतोष कांबळे पंचायत समिती उमरगा, यांनीही चंद्रकांत पाटलांचा सत्कार केला.डॉ. रमाकांत पाटील यांनी पाटील कुटुंबीयांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत भारत आणि मूकनायक वृत्तपत्राचे संपादकीय पुस्तक भेट देऊन सत्कार केला.
चिरंजीव सुजित चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांच्या निवृत्ती निमित्त निवृत्तीवर आधारित दोन अतिशय अर्थगर्भ कविता सादर केल्या.
कार्यक्रमासाठी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक सुभाष वैरागकर, केसर जवळगा ग्रामपंचायतचे माजी सरपंच विष्णू रामजी पाटील ,कलाकार पाटील, अनिल जामगे, पुणे पोलीस, दिगंबर कल्याणकर, ग्रामसेवक ,सोलापूर, मोहन डोणगावे ,ग्रामसेवक पुणे, मोहन पाटील गजानन डोणगावे, अरुण डोणगावे, शितल पाटील तृप्ती, पाटील,दाळिंब बलसुर केंद्रातील शिक्षक शिक्षिका परिसरातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार डॉक्टर रमाकांत पाटील यांनी मांडले.
