भूम (प्रतिनिधी)- जय हनुमान समाज विकास संस्था, पुणे संचलित रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचा 8 वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. बालसंस्कार आणि कलागुणांचे दर्शन घडवणारा हा सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभाग शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गोरख भोरे, युवा उद्योजक महेश जगताप, थ्री एस अकॅडमीचे संचालक सोमनाथ देवकर, उच्च न्यायालय संभाजीनगरचे ॲड. रामराजे देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
ऐतिहासिक नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी-मराठी चित्रपट गीते, लोकगीते, शेतकरी गीत, फनी डान्स आणि लेझीम नृत्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम शेख यांनी केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी हरिष धायगुडे, प्राचार्य शीतल बावकर, भाग्य जैन यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
