धाराशिव (प्रतिनिधी)- बाल विवाह मुक्त अभियानाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चाइल्ड हेल्प लाईन कक्ष 1098 अंतर्गत विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे तसेच चाइल्ड हेल्प लाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या अंतर्गत धाराशिव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था अध्यापक विद्यालय,धाराशिव, माविम अंतर्गत कार्यशाळेमध्ये माहिती देण्यात आली.तसेच रविकिरण स्कूल धाराशिव, रामतीर्थ तांडा तुळजापूर एन.एस.एस. कॅम्प, जि.प.प्रा.शा. तावरजखेडा, जि.प. प्रा.शा. खामसवाडी, जि.प.प्रा. शा. चिवरी, एस.एस.पी.महिला नेतृत्व विकास कार्यक्रम संवाद कार्यशाळा, जि.प.प्रा.शा.जागजी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी बालहक्क तसेच मुलांच्या समस्या याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बेटी बचाव, बेटी पढाव आणि बालविवाह या विषयांवरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालकांसंबंधी विविध योजनांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
चाइल्ड हेल्प लाईन कक्षाचे समुपदेशक वंदना कांबळे, सुपरवायझर अमर भोसले,पल्लवी पाटील तसेच केस वर्कर अभयसिंह काळे यांनी 1098 चाइल्ड हेल्प लाईन कक्षाविषयी माहिती दिली. या जनजागृती कार्यक्रमाला संबंधित प्रशाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.