धाराशिव (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक (आरपीआय-डे)च्या धाराशिव महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका राजेंद्र सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. जिल्हा प्रमुख राज धज यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी (दि. 17 मार्च) आयोजित पक्षाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीत पक्ष संघटन बळकटीकरण, महिला सक्षमीकरण आणि विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना बालिका सूर्यवंशी यांनी पक्षाच्या धोरणांचा प्रसार करून जिल्ह्यात महिला संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रमुख राज धज, दिनेश बाबुराव खळे, हनुमंत भीमराव सूर्यवंशी, सुभाष विठ्ठल देवकर, कुमार शिवाजी गायकवाड, अनिल वाघमारे, संतोष धावारे, हाफेज ढलूज, सत्यम गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
