धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी शासकीय दुध डेअरी येथील एक एकर जागेचा ताबा नगरपरिषद धाराशिव कडे सोपवण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर.
लोकनायक आमदार राणाजगजीतसिंह पाटीलयांच्या अथक प्रयत्नामुळे मातंग समाजाची 40 वर्षापासून प्रलंबित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंबंधीची मागणी मंजूर. शासकीय दुध डेअरीची एक एकर जमीन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, धाराशिव येथे उभारण्यासंदर्भात लोकनायक आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे महायुती सरकारने शासकीय दुग्ध डेअरीची एक एकर जागा ज्याची शासकीय किंमत 2 कोटी 08 लाख रुपये असून ही रक्कम नगरपरिषद धाराशिव यांनी महाराष्ट्र शासनाला देणे अपेक्षित होते. परंतु नगरपरिषद धाराशिव यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे लोकनायक राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांनी ही जागा शासनाकडून मोफत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे सातत्यपूर्ण प्रयत्न करून ही जागा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी विनामूल्य स्वरूपात मिळवून घेतली आहे.
