धाराशिव (प्रतिनिधी)-  केंद्र शासन व संबंधित कंपन्यांकडून राज्यात एलपीजी गॅस तसेच पेट्रोल -डिझेलच्या पुरवठ्यात कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सी तसेच पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा नियमितपणे सुरू असून पुरेसा साठा उपलब्ध आहे.त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

नागरिकांनी आवश्यकतेनुसारच गॅस सिलेंडर बुकिंग करावे. तसेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावी. गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करून साठवणूक करण्याचा प्रयत्न करू नये. गॅस सिलेंडरचे वितरण नियमानुसार व बुकिंगनुसार केले जाईल. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच पेट्रोल पंपांवर घाईगडबडीत रांगा लावणे किंवा मोठ्या प्रमाणात इंधन साठवून ठेवणे टाळावे. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असून नागरिकांनी शांतता व शिस्त राखून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

 
Top