धाराशिव (प्रतिनिधी)- आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले यांचा सत्कार बहुजनाचे नेते धनंजय शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी पत्रकार राजाभाऊ वैद्य, सुधीर पवार, हुंकार बनसोडे, रहीम शेख, गायकवाड, नंदकुमार शेटे, उज्वल माने आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. टकले यांनी प्रत्येक समाजाचे साहित्य संमेलन सुरू झाले आहे. त्यामुळे आदिवासी धनगर समाजाचेही साहित्य संमेलन असावे, या दृष्टीकोनातून प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश आले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे होळकर वाड्यात होणारे साहित्य संमेलन हे सहावे असून, दोन दिवसाचे आहे. यांची माहिती डॉ. टकले यांनी दिली. 


 
Top