तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद पेठ प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर कोळपे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिक्षा शिंदे, सचिन देवकते, अजित कदम, संगिता झिंजे,लखन आदटराव, गोपाळ लकडे, तानाजी बंडे, विजय पडुळकर, हनुमंत थोरात उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुलभा पवार यांनी केले.पहीलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांंचे साखरेचा हार, गुलाबपुष्प,सचित्र बालमित्र पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.देशपांडे यांनी केले तर आभार ही.व्ही.गिरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. एस.एम.पवार,एस.एस.दराडे,ही.व्ही.गिरी ,व्हील.बी.धालगडे,व्हील.एस.मते,यु.बी.नाईक,जी.ऐ.लोभे,व्हील.व्ही.उंदरे,एस.एस.जगताप,के.एस.भिसे यांनी परीश्रम घेतले.

 
Top