तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे २९ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

भीष्म फाउंडेशन स्कूल ऑफ इंडियन नाॅलेज सिस्ऊ,पुणे विश्व मंदिर परिषद , भीष्म १०८ सोमयाग यज्ञ प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने येडशी येथील श्री रामेश्वर देवस्थान येथे अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण विश्वाचे कल्याण, दैवी ऊर्जेची अनुभूती,त्रुतू चक्रांचे संतुलन,पंच महाभूतांचे संतुलन, पर्यावरण आणि वायुमंडलाचे शुद्धीकरण, वैयक्तिक आरोग्य प्राप्ती,आभा(आॅरा),पंचकोशीय शुद्धी,भूमी-जल पोषण सुधार आणि शुद्धीकरण यासाठी अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. येडशी येथील श्री रामेश्वर मंदिर देवस्थान येथे आयोजित अत्यग्निष्टोम सोमयाग यज्ञांचा मानवावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी परदेशातून विद्वान येणार आहेत अशी माहिती वेदमूर्ती धनेश जोशी यांनी दिली.

 
Top