तेर / प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी धाराशिव तालुक्यातील तेर येथील दूरक्षेत्रला भेट देऊन कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयातील पुरातन वस्तूची पहाणी केली.


यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,ढोकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे , पोलीस पाटील फातेमा मनियार,गोरख माळी, राहुल गायकवाड,नरहरी बडवे पूजा चव्हाण, मज्जित मनियार आदी उपस्थित होते.

 
Top