धाराशिव / प्रतिनिधी
सामाजिक क्रांतीचे जनक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्षास सुरुवात होत असून 11 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2027 या वर्षांमध्ये महात्मा फुले यांची जयंती वर्षभर शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे. वर्षभरासाठी एकच समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा माजी *नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत* यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष *रविकांत गोरे ,* स्वागताध्यक्ष: *दत्ता गोरे माळी* कोषाध्यक्ष: *सौदागर गोरे माळी* सचिव: *अमर माळी* कार्याध्यक्ष: *बळीराम माळी* मिरवणूक प्रमुख: *स्वराज जानराव प्रवीण वाघमारे सचिन दिलपाक* यांची देखील निवड करण्यात आली तसेच मार्गदर्शक व सल्लागार समितीमध्ये *महादेव माळी, संजय माळी, गोविंद गोरे राजाभाऊ माळी, चंद्रशेखर सुरवसे, चंद्रकांत गोरे, पांडुरंग माळी* , मान्यवरांची निवड करण्यात आली.
या समितीमार्फत सबंध वर्षभर विविध कार्यक्रमांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणे हा मूळ हेतू असून यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
तसेच महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट देखील वर्षभर दाखवण्यात येणार आहे.
महात्मा फुले यांच्यावर आधारित पुस्तकांचे देखील वाटप करण्यात येणार आहे.
पारंपारीक वाद्याच्या सह डॉलबिमुक्त मिरवणूक काढण्यात येणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना या महत्वपूर्ण योजनेची शिबिरे आयोजित करून जिल्ह्यातील गोरगरीब लोकांचे प्रमाणपत्र मोफत काढून दिले जाणार आहे.
विविध क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे या अशा भरगच्च कार्यक्रमाने वर्षभर महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमांचे आठवण म्हणून व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे महात्मा फुले यांच्यावर लिखित लेख असलेला *क्रांतीसुर्य* हा विशेष अंक प्रकाशित करण्यात येणार आहे क्रांती सूर्याची *द्विशताब्दी* जयंती ऐतिहासिक बनवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे सर्वानुमते ठरले. जिल्ह्यातील सर्व समाजबांधवानी या जयंती महोत्सवात सहभागी होऊन आणि अनमोल असे योगदान देऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष *पृथ्वीराज चिलवंत* यांनी केले आहे.
