परंडा (प्रतिनिधी)- परंडा व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासाठी वरदान ठरलेले सिना - कोळेगाव प्रकल्प अंतर्गत उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन परंडा तालुक्यातील कंडारी कालवा द्वारे पाणी सोडल्याने तालुक्यातील भोंजा हवेली येथे शेतकऱ्यांनी पाण्याचे पुजन केले आहे.
सिना कोळेगाव प्रकल्प हा परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला असून शेतकऱ्यांना वेळोवेळी सिना कोळेगाव प्रकलप चे कार्यकारी अभियंता कल्याणी कालेकर पाटील, अधिकारी चौगुले,उप कार्यकारी अभियंता मस्तुद ,अभियंता वचकल, जेई जोशी,गरड ,अनिकेत अधिकारी यांच्यासह तालुक्यातील नेते गण यांच्या सहकार्याने उन्हाळी हंगामातील आवर्तन हे पशु,पक्षी जनावरे आणि पिकांना पाणी उपलब्ध होत असून यामध्ये गव्हू, हरभरा,मका, कांदा,फळबागा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असून सोनारी, मुगांव, कंडारी, भोंजा हवेली येथील हजारो शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण झाले असून भोंजा हवेली येथे शेतकऱ्यांनी कॅनॉल मधील पाण्याचे पुजन करून फुले,श्रीफळ अर्पण केले. यावेळी शेतकरी निखिल मोरे, सदस्य अरुण कोळी, डायरेक्टर गणेश नेटके, संचालक ऋषीनाथ नेटके, संचालक अमोल नेटके, गोवर्धन मदणे, नेटके शेळीपालन उद्योजक देविदास सरवदे आदी शेतकरी उपस्थित होते. कडक उन्हाळ्यात पाणी कालवा द्वारे पाणी सोडल्याने शेतकऱ्यात समाधान व्यक्त करण्यात करित आहे.
