मुरुम ( प्रतिनिधी)- केवळ पायाभूत सुधारणा रस्ते, मोठे प्रकल्प उभारले म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. त्याबरोबर समाज घडला पाहिजे
म्हणुनच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि दूरदृष्टी असलेले नेते स्व. यशवंतराव चव्हाण यानी राजकारणाबरोबरच सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासासाठी लोककलांना प्रोत्साहन दिले. सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव आणि कला स्पर्धा आयोजित करून लोककलांचा प्रसार केला.
ग्रामीण भागातील कलाकारांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून दिली.
मराठी साहित्याचा विकास व्हावा म्हणून त्यांनी साहित्यिकांना प्रोत्साहन दिले. त्यांनी महाराष्ट्रातील लोककला, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ मिळाले आणि मराठी साहित्य व संस्कृतीचा विकास झाला. म्हणुन वैचारिक सुसंस्कृत समाज घडला असे प्रतिपादन प्राचार्य डॉ संजय अस्वले यानी केले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई धाराशिव जिल्हा केंद्र, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र आणि वाणिज्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि साहित्याच्या विकासातील योगदान या विषयावर व्याख्यान आणि लोकलला प्रकार याचे सादरीकरण उपक्रमाचे आयोजन संपन्न झाले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ अस्वले बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य डॉ पी ए पीटले यानी आपल्या मार्गदर्शनात यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय आणि सामाजिक कार्य म्हणजे महाराष्ट्र यशवंत होण्यासाठी उचललेले मोठे पाऊल होते इतकेच नव्हे तर समाज विकासाचा पायाच तो होता. असे प्रतिपादन करताना विद्यार्थ्यांनी कला- संस्कृती साहित्य जोपासणे आणि वाचन संस्कृती अंगीकारण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रियांका इंगळे, सूरज उमरगेकर, वैष्णवी काळे, आरती सोनकांबळे, ज्योती धुमाळ, साईराज माने आदी विद्यार्थ्यानी लोककला आणि संस्कृती याचे सादरीकरण केले.
यावेळी अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. प्रशांत साळुंके, डॉ अजित अष्टे, डॉ व्ही एन हिस्सल, डॉ एस पी. पसरकल्ले, डॉ ए के कटके, डॉ पी. डी पाटील, डॉ. बी जी माने, डॉ विजय मुळे, डॉ खंडू मुरळीकर, प्रा. ओमप्रकाश पवार, प्रा. विद्या गायकवाड, प्रा. अक्षता बिरादार प्रा राजूरकर, प्रा बनसोडे यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन डॉ अष्टे, आणि आभार डॉ मुळे यानी केले.
