धाराशिव (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांचे प्रतिपादन.
तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या महाविद्यालयात जिमखाना आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने वार्षिक पारितोषिक शैक्षणिक वर्ष 2025-26 वितरण सोहळा दिमाखात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक देविदास पाठक यांनी वरील प्रतिपादन केले. पुढे ते म्हणाले की, “विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, शिस्त आणि कर्तव्यभावना जोपासली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिकपणाच्या बळावर यश संपादन करावे.” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 या धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्य विकासावर भर द्यावा व कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन उद्योग , व्यवसाय, प्रशासन इत्यादी क्षेत्रात भरारी घ्यावी असे त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. अर्जुन जाधव हे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. ते बोलताना म्हणाले की विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना शिक्षणाची जी संधी उपलब्ध झाली त्या संधीतून त्यांनी पुढे जावे शिक्षण हाच सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक , तसेच वैयक्तिक विकासाचा एकमेव मार्ग आहे. शिक्षण मानवाला ज्ञान तर देतेच त्याचबरोबर सामाजिक जाणीव, वैयक्तिक विकास आणि सांस्कृतिक विकास घडवण्याचे कार्य करते.
सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. मंत्री आडे यांनी केले. तर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष तथा मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. बापूराव पवार यांनी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक, क्रीडाविषयक घेतलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा व आढावा सभागृहासमोर मांडला. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य जीवन पवार यांनी विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी ध्येय, चिकाटी , कष्ट, प्रामाणिकपणा तसेच यश मिळवण्याची जिद्द मनाशी असणे गरजेचे असते. प्राचार्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरित व प्रोत्साहित केले. तसेच सदर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास आवर्जून उपस्थित असणारे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. आप्पासाहेब पाटील आणि मा. प्रा. धनंजय लोंढे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर सर्व यशवंत , गुणवत्ता विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योतिर्लिंग क्षीरसागर तर आभार प्रदर्शन प्रा. क्रांती कदम मॅडम यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. नेताजी काळे, प्रा. स्वाती बैनवाड, प्रा. निलेश एकदंते, प्रा. सुदर्शन गुरव, प्रा. सिद्धेश्वर सुरवसे, डॉ. दत्तात्रय साळुंके , प्रा. बाळू कुकडे, प्रा. राणुबाई कोरे, प्रा. सतीश वागतकर , तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले सदर कार्यक्रमास यशवंत गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
