भुम (प्रतिनिधी)-  भूम नगर परिषद समोर खेळ खेळूया बक्षीस जिंकूया लकी ड्रॉ च्या विजेत्या ठरलेल्या कोमल तुषार माळी यांना अभिनेत्री अश्विनी महागडे, नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, प्रेमा चोरमले, जान्हवी जाधव, अर्चना दराडे यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आले आहे. 

आरजे अक्षय यांनी महिलांची प्रश्नमंजुषा, तळ्यात मळ्यात, गाण्यावर डान्स, उखाणे, विनोद, संगीत खुर्ची व इतर कार्यक्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सई गाढवे यांनी केले. महिला दिनानिमित्त नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून भूम शहरात विविध योजना राबवत असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी प्रथम बक्षीस पूजा वारघडे (सोपासेट), प्रतिभा शिंदे (दिवाण), आशा चौधरी (एलईडी टीव्ही ), रेखा जावळे (डायनिंग टेबल), अनिता जाधव (ड्रेसिंग टेबल), रेणुका टेकाळे (कुलर), सोनाली सोनटक्के (टीपॉय), छाया नाईकवाडी (वृंदावन), बानू शेख (देवघर), सारिका खोसे (फॅन), कोमल माळी (गॅस शेगडी) यांना मिळाले. या कार्यक्रमासाठी अमहिलांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे अक्षय यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनुष्का गाढवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोमल गाढवे, दैवशाला साबळे, प्रतिक्षा शेटे, नूतन सुर्वे, सुचिता नाईकवाडी, अर्चना साळुंखे, भारती माळी, निलोफर पुरेशी, भावना टिपे, रीमा शिंदे, भाग्यश्री माने, वैष्णवी अंधारे यांनी पुढाकार घेतला.

 
Top