भुम (प्रतिनिधी)- भूम आगार कामगार संघटनेच्या आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी महेश शिंदे तर सचिव पदासाठी वैभव हराळ यांची निवड झाली. भुम एस टी आगाराच्या इतिहासात आज प्रथमच अत्यंत अतिथटीची निवडणूक होऊन यामध्ये अध्यक्ष पदासाठी महेश शिंदे यांची बिनविरोध रित्या निवड झाली. तर संघटनेच्या सचिव पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होऊन यामध्ये संघटनेचे सचिव म्हणून वैभव हराळ यांची निवड झाली. कामगार संघटनेच्या या निवडणुकीत आगारातील 166 मतदारांपैकी 158 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यापैकी वैभव हाराळ यांना 102  मतदान झाले. तर विरोधी एम आर सानप यांना 56 एवढे मतदान झाले कामगार संघटनेच्या भूम आगार अध्यक्षपदी शिंदे व  सचिव पदी हराळ यांची निवड झाल्याबद्दल आगारात कर्मचाऱ्याकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. यावेळी कामगार संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून  एन एम नागरगोजे, एस ए वरळे, एक एम सुतार, गणेश वाघमारे, सागर दातखिळे, किरण कांबळे यांनी काम पहिले.


 
Top