तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढेकरी येथे शनिवार दि 28 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता रोड लगत असलेल्या उसाच्या शेताला आग लागली मात्र तुळजापूर नगरपालिकेचे अग्निशामक वाहन 15 मिनिटात येऊन त्यांनी आग विझवल्याने पुढील मोठ्या आर्थिक नुकसान कळले यात शेतकऱ्याचा अर्था ऊस जळून खाक झाला मात्र त्यापुढील शेतकऱ्याची शेतातील ज्वारी वाचवण्यास अग्निशामक दलाला यश आले तुळजापूर तालुक्यातील ढेकरी लगत 5 13 गट नंबर मध्ये येथील दादा मूडफणे यांची रोड लगत शेतजमीन असून त्यात दीड एकर वर असणाऱ्या उसाच्या शेताला शनिवारी सकाळी अचानक या उसाला आग लागली यात अर्धा ऊस जळून खाक झाले तुळजापूर अग्निशामक दलाचे वाहन वेळेवर, आल्याने अर्धा ऊस वाचला व त्यापुढील साडेचार एकरात उभे असलेले ज्वारी वाचली . सदरील रस्त्यावरून किंवा वाहनांमधून जाणाऱ्यांनी सिगरेटचे थोटके फेकला ने आग लागल्याया संशय व्यक त होत आहेसदरील आग हे अग्निशामक दलाचे प्रमुख देविदास देवकते वाहन चालक हर्षद क्षीरसागर फायरमन शुभम साळुंखे संजय बनसोडे अजय सोनवणे सह त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.
