तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवीचा चैत्र पौर्णिमा महोत्सव 2026 हा दिनांक 30 मार्च 2026 ते 03 एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
या महोत्सव काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेता, तसेच सलग सुट्ट्यांचा विचार करून मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्याअनुसार, दिनांक 31 मार्च 2026 रोजी रात्री 01:00 वाजल्यापासून ते 05 एप्रिल 2026 रोजी रात्रीपर्यंत भाविकांना ‘बिडकर पायऱ्या’ येथून दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाने सर्व महंत, पुजारी, सेवेधारी तसेच भाविकांनी या व्यवस्थेची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार तथाव्यवस्थापक प्रशासन माया माने यांनी केले आहे. दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
