भुम (प्रतिनिधी)- भूम तालूक्यातील माणकेश्वर येथील जि प प्राथमिक शाळा (अंधारेवस्ती) येथील इयत्ता 5 वी च्या वर्गातील विद्यार्थिनी कु.आरोही अमोल सांगडे हिची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे निवड झाली आहे.
डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये आरोहीने उज्वल यश प्राप्त करून जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे प्रवेश मिळवला आहे. आरोहीने आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले आहे. आरोहीला वर्ग शिक्षक श्री .दत्ता घोडके, तिचे आई वडील , मुख्याध्यापिका अलका तांबे, संदीप मोरे, अमोल चोपडे, प्रमिला जावळे, मंजुषा सुरवसे, विद्या वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल राहुल भट्टी (गटशिक्षणाधिकारी भूम), सोमनाथ टकले (विस्ताराधिकारी आष्टा) व निळकंठ बशेट्टी (केंद्रप्रमुख माणकेश्वर) यांनी तिचे अभिनंदन केले. आरोहीच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, सर्व ग्रामस्थ माणकेश्वर यांच्याकडून कौतुक होत आहे.
