धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त अंजुमन वेलफेअर सोसायटी, धाराशिवच्या वतीने तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीत महिला सन्मानाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण तसेच तेर विभागातील देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.समाजातील महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी अंजुमन वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला यांनी महिलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.या कार्यक्रमाला समिती सदस्य गणेश रानबा वाघमारे, विस्तार अधिकारी किशोर वंजारवाडकर, सदस्य तोडकरी, कृषी विभागाचे सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कार्याचा गौरव करून समाजात महिला सन्मानाचा संदेश देण्यात आला.
