धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाच्या उपगटनेतेपदी सुवर्णाताई सतीश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
सुवर्णाताई पाटील या शिवसेना युवासेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांच्या मातोश्री आहेत. पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रा डॉ तानाजी सावंत, संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिवसेनेचे जाळे मजबूत करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी निभावली आहे.
