तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर येथे आज सकाळी पाथरी, जिल्हा परभणी येथील श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी देवीच्या चरणी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण केली.
वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी देवीच्या चरणी अर्पण केली. या प्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
