धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांना अर्थशास्त्र विषयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे. 

डॉ. मारुती लोंढे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि पंढरपूर तालुक्यातील ठिबक सिंचनाच्या विकासाचा तौलनिक अभ्यास  या महत्त्वपूर्ण विषयावर पीएच.डी.चे संशोधन पूर्ण केले आहे. तर जनता सहकारी बँक लिमिटेड, कुर्डूवाडी एक चिकित्सक अभ्यास या विषयावर एम. फिल चे संशोधन पूर्ण केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर ते निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

याच विद्यापीठाच्या बीए भाग 2 अभ्यासक्रमासाठी त्यांचे आर्थिक विकास व नियोजन हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून लागू झाले आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित त्यांनी अनेक क्रमिक पुस्तके व संदर्भ ग्रंथाचे लेखन करून एकूण 34 ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या विद्यापीठाने डि.लीट ही मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. आतापर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

 
Top