धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहर व जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशन व  GJEPC जेम्स अँड ज्वेलरी स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल मुंबई व संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासन आपल्या दारी हा कार्यक्रम धाराशिव येथे शेकडो सराफ सुवर्णकरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमांमध्ये आमदार कैलास पाटील हस्ते सराफ सुवर्णकार बांधवांना शासन परिचय कार्ड मोफत वाटण्यात आले.

 GJEPC अंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनेची माहिती भोसले मॅडम व पांडे मॅडम यांनी दिली. केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. अशी विनंती ही केली. तसेच संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बोऱ्हाडे व त्यांच्या टीमने सर्व सराफ सुवर्णकार बांधवांना 411 व 317 कलमाविषयी  व्यापारी बांधवांना माहिती दिली. व्यापार कसा करावा पोलीस रिकव्हरीसाठी आल्यानंतर काय करावे या विषयी माहिती देण्यात आली.

आमदार कैलास पाटील यांनीही सराफ सुवर्णकार बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. हा कार्यक्रम मराठवाड्यात पहिल्यांदाच धाराशिव शहरात घेण्यात आला. यावेळी आमदार कैलास पाटील, सोंडुलकर, साळुंखे, बोराडे, बनछोड, शेळके, दीक्षित व इतर मान्यवरांचा सत्कार कपिल शर्मा, रामदास वंजारी, सारडा, मल्हारी ओमासे, मुकुंदराव घुले, भारतराव थडवे, भागवत पोतदार, बंडू थडवे, प्रकाश खंडेलवाल, संजय पंडित, नारायण टेहरे, दत्ता पंडित, संतोष पंडित, राजेश कदम, वैभव बोंधरे, राजेश जालनेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन भागवत थडवे यांनी केले. 

 
Top