मुरुम (प्रतिनिधी)- दि .30 मार्च 2026 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागातील कॅडेट अजय परमेश्वर घारगे राहणार कोंडजीगड ता. लोहारा येथील रहिवासी हा भाग भूकंपग्रस्त परिसरात असल्यामुळे अनेक कठिण समस्याला सामोरे जाऊन वडिलांने कुटुंब सांभाळले. उदरनिर्वाह हा केवळ शेतीच असल्यामुळे वडिलांनी अजयला शिक्षणासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे बीए प्रथम वर्षात तसेच एनसीसी मध्ये प्रवेश घेण्यास सांगितला. घरची हालाकिची परिस्थिती असल्यामुळे मुलाला पोलीस करण्याचे स्वप्न मनात होते. ते वडिलाचे स्वप्न अजयनी पूर्ण करून दाखवले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी त्याचा सत्कार करून पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कारप्रसंगी प्राचार्यांनी मार्गदर्शन करताना इतर कॅडेटसनी पण यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावे असे आव्हान केले. या सत्कार समयी डॉ पद्माकर पिटले, कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, डॉ सुभाष इंगळे,  डॉ सन्मुख मुच्छटे, डॉ खंडु मुरळीकर, राजकुमार सोनवणे, नितीन कोराळे प्राध्यापक, कॅडेट्स उपस्थित होते.

 
Top