धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव व ओपन लिंक फाउंडेशन यांच्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’ (विनोबा ॲप) माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना दरमहा प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
जिल्हा स्तरीय स्कॉलरशिप सराव परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या शाळांचा सन्मान गट शिक्षण कार्यालय, धाराशिव येथे करण्यात आला. यामध्ये जी प. शाळा अळणी जि.प. कोडगाव आंबेजवळगा, जि.प. ताकविकी व जि.प. राजुरी या शाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. सदर पुरस्कार सय्यद ए. जी. (गट शिक्षण अधिकारी, धाराशिव) व हाके डी. आर.(विस्तार अधिकारी) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गट शिक्षण कार्यालयातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच ‘आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम’चे प्रकल्प अधिकारी मनोज बिरादार उपस्थित होते.कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत तालुक्यातील इतर शिक्षकांना प्रेरणा देण्याचे आवाहन केले. तसेच सय्यद ए. जी. यांनी शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचे विशेष कौतुक केले.
जि.प. आळणी येथील मुख्यध्यापक बशीर तांबोळी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर विनोबा ॲप व स्कॉलरशिप सराव परीक्षेमुळे त्यांच्या शाळेला मोठा फायदा झाल्याचे सांगितले. त्यांच्या शाळेतील एक विद्यार्थी नवोदय परीक्षेत धारक ठरले असून त्यांनी विनोबा ॲपचे आभार व्यक्त केले.
