परंडा (प्रतिनिधी)- आयोजित केलेला रोजगार मेळावा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवीन संधी नवी स्वप्ने आणि नवे भविष्य घडवणारा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार डॉ.सतीश कदम यांनी महाविद्यालयात उद्घाटन प्रसंगी केले. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन शुक्रवार दि.13 रोजी करण्यात आले.जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 2026 चे आयोजन करण्यात आले. 11 आस्थापनाचे प्रतिनिधी मिळून 210 पदासाठी मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया करणार आहेत. यामध्ये 140 महिला तर 169 पुरुष असे एकूण 299 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत.या रोजगार मेळाव्यामध्ये सुदर्शन सौर शक्ती वाळूज छत्रपती संभाजी नगर, दर्शना सोलवंट बार्शी, तेजस सुपर स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड धाराशिव, स्टार एंटरप्राइजेस परंडा, एस एम पब्लिक स्कूल परंडा, आदर्श इंजिनिअरिंग वर्क्स भुम ,एलआयसी धाराशिव, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड धाराशिव, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर, सुरेटा उद्योग परंडा, रेड अलर्ट फायर सिस्टीम बार्शी या आस्थापनांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला होता.या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय बप्पा निंबाळकर, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहासकार डॉ. सतीश कदम प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता चव्हाण सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास धाराशिव कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव तसेच अभिजीत लांडे उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र धाराशिव बालकिशन जाजू सीए बार्शी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ.किरण देशमुख यांची उपस्थिती होती.या रोजगार मेळाव्या प्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील सहशिक्षक प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रोजगार मेळाव्यासाठी परंडा शहरातील तालुक्यातील आजी-माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी उपस्थित राहून विविध आस्थापनामध्ये मुलाखती दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता चव्हाण सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास धाराशिव यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मिळायला संदर्भात सविस्तर वृत्तांत दिला .यावेळी श्री अभिजीत लांडे उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र धाराशिव जीएम दिवटे व डॉ सतीश कदम यांनी आपली मनोगत व्यक्त केली. सर्वांनी आपण उद्योग क्षेत्रामध्ये कसे यशस्वी झाले या संदर्भात विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले .अध्यक्षीय समारोप श्री संजय बप्पा निंबाळकर यांनी केला. त्यांनी आपल्या अध्यक्षा समारोपामध्ये सांगितले की विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जी संधी मिळते त्या संधीचे सोने केले पाहिजे. छोट्या छोट्या उद्योगधंद्यातून मोठ-मोठे उद्योगपती झालेली उदाहरणे त्यांनी दिली. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. संजय गुरव सहाय्यक आयुक्त जिल्हा उद्योग केंद्र धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ.अरुण खर्डे यांनी मानले.


 
Top