भूम (प्रतिनिधी)-  जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना व युवासेना यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील महिला कामगारांसाठी साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत महिला बांधकाम कामगारांना गृहपयोगी अत्यावश्यक संच, सुरक्षा संच पेटी संच, कामगार कार्ड, अत्यावश्यक साहित्य तसेच शालेय साहित्य यांचे वितरण करण्यात आले. महिलांच्या कष्टाचा सन्मान करून त्यांना मदत व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे मत युवासेनेचे पांडुरंग धस यांनी व्यक्त केले. तसेच कामगारांच्या मुलांसाठी शालेय फी साठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व शालेय साहित्य, तसेच कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मोफत दवाखाना व औषधोपचार अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  या उपक्रमासाठी विशेष कार्य अधिकारी ज्ञानेश्वर वसेकर, विशेष कार्य अधिकारी गणेश कुकडे, स्वीय सहाय्यक दीपक येवते, बांधकाम कामगार अधिकारी धाराशिव अस्मिता घाडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 


 
Top