परंडा (प्रतिनिधी)- परंडा पंचायत समितीच्या शिवसेना (शिंदे गटाचे) सभापती पदासाठी सौ.अर्चना आण्णासाहेब जाधव व उपसभापती पदासाठी परशू गवारे यांची निवड करण्यात आली आहे.
सभापती व उपसभापती निवडीसाठी शुक्रवार दि.6 रोजी पंचायत समिती सभागृहात विशेष सभा घेण्यात आली होती.सभापाती साठी शिवसेनेच्या अर्चना जाधव आणि भाजपाच्या मोनिका पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपसभाती शिवसेनेचे परशू गवारे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) चे पंकज पाटील यांनी अर्जदाखल केला होता. निवडूक प्रक्रिया सदस्यांचे हात उंचावून मतदान पद्धतीने घेण्यात आले. यात अर्चना जाधव यांना सहा मत तर सभापती मोनिका पाटील यांना चार मत मिळाले. तर उपसभापती पंकज पाटील यांना चार मत मिळाले. त्यानुसार बहुमताच्या जोरावर सभापती अर्चना जाधव व परशू गवारे यांची उपसभापती साठी निवड करण्यात आली.
निवडणूकीत पिठासीन अधिकारी म्हणून श्रीकांत पाटील यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य म्हणून तहसीलदार निलेश काकडे, गटविकास अधिकारी विनोद यादव व मिलींद पराळे यांचे सहकार्य मिळाले. पंचायत समितीच्या सध्याची संख्याबळ शिवसेना शिंदे गटाचे सहा तर भाजपाचे एक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर शिवसेना ठाकरे गटाचे एक सदस्य पक्षिय बलाबल असून, सभापती अर्चना जाधव व उपसभापती परशू गवारे यांची निवड होताच शिवाजी चौकात कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
