भुम / प्रतिनिधी
गेल्या सहा वर्षांपासून मंजूर असलेले 30 के ही सब स्टेशनचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा 6 एप्रिल रोजी सोलापूर धुळे राज्य रस्त्यावर उपोषण करणारे येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे यांनी दिली आहे
याबाबत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की भूम तालुक्यातील गिरवली येथे गेल्या सहा वर्षांपूर्वी 30 केवी सब स्टेशन मंजूर करण्यात आले आहे परंतु सदर सब स्टेशनचे काम अद्याप पर्यंत सुरू करण्यात आले नाही यामुळे डोकेवाडी गिरवली सोन्नेवाडी अंजन सोडा या परिसरातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत
तसेच डोकेवाडी तालुका भूम येथील अनेक वर्षापासून नागरिक मागणी करत असलेल्या शंभर एचपी ची विद्युत रोहीत्र ही अद्याप मंजूर केली नाही तेव्हा सदरची विद्युत रोहीत्र ही त्वरित मंजूर करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा येत्या 6 एप्रिल रोजी धुळे सोलापूर राज्य रस्त्यावर गिरवली फाटा उपोषण करणार असल्याचे निवेदन भूम पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब खरवडे यांनी ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली आहे